Supriya Sule : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी? मविआचं जागा वाटप कधी होईल?, सुप्रिया सुळे यांनी केले मोठे विधान…

Supriya Sule : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे या निवडणुका ऑक्टोबरमध्ये लागतात की नोव्हेंबरमध्ये? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे लक्ष लागलेलं असतानाच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे.
राज्यात नोव्हेंबरमध्येच निवडणुका होणार असल्याचा अंदाज सुप्रिया सुळे यांनी वर्तवला आहे. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागून नोव्हेंबरमध्ये मतदान होईल आणि नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा अंदाज वर्तवला आहे. येत्या ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल. त्यानंतर १० ते १२ नोव्हेंबरच्या आसपास राज्यात मतदान होईल.
दरम्यान, १५ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होऊन ही निवडणूक पार पडलेली असेल, असं सांगतानाच येत्या ८ ते १० दिवसात निवडणूक आयोगाला या गोष्टी फायनल कराव्याच लागतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. निवडणुकीचा निर्णय जितक्या लवकर होईल, तेवढा उमेदवारांना फायदाच होईल, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. Supriya Sule
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, येत्या दोन दिवसात मविआची जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील ८ ते १० दिवसात जागा वाटपातून ठोस काही बाहेर पडेल. महाविकास आघाडीची कालही चर्चा झाली. आता बघा आज सप्टेंबर आला आहे.
आमची ८-१० दिवसात चर्चा होईल. कारण त्यानंतर गणेशोत्वस आणि पितृपक्ष, तसेच दसरा आहे, असं सांगतानाच महायुतीने जागा वाटप कसं करावं? काय करावं ही त्यांची भूमिका आहे. ते मित्र पक्षाला कशी वागणूक देतात हे तुम्ही पाहिलं असेलच, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.