Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक करणाऱ्याने केली २०० डॉलर्सची मागणी, धक्कादायक माहिती आली समोर..
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे या कायमच सोशल मिडीयावर ॲक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज त्यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर आपला फोन हॅक झाल्याची माहिती दिल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या खात्यावरून २०० डॉलर्सची मागणी तर पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून १५ ते २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. हा अकाउंट हॅक करणारा तरुण बिहार राज्यातील असल्याचे सूत्रांची माहिती आहे. या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील २० पदाधिकाऱ्यांचं व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरून २०० डॉलरची (साधारणतः 16000 रुपये) मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच पदाधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप अकाउंट वरून १५ ते २० हजार रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळेंसह पदाधिकाऱ्यांचा व्हाट्सअप अकाउंट हॅक करणार तरुण बिहार राज्यातील असल्याची सूत्रांची माहिती आहे. भालकेश कुमार नावाच्या व्यक्तीकडून फोन पे च्या माध्यमातून पैशांची मागणी झाली असून या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सॲप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याच्या तक्रारीही आहेत. त्यातच आता थेट एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.