Supriya Sule : भावाने घोषणा केलेल्या लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? राज्यात रंगली चर्चा, जाणून घ्या…
Supriya Sule : महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देणार आहे.
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभेची निवडणूक २ ते ३ महिन्यावर अली आहे. त्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस पडणार आहे.
लाडकी बहिण योजना चांगली आहे, मात्र, त्यामध्ये अटी शर्ती टाकल्या आहेत. खरंच योजना किती महत्वाची आहे, याचा अभ्यास सुरु आहे. यामध्ये भष्ट्राचार होऊ नये, योजनेचं स्वागत केले पाहिजे असेही सुळे म्हणाल्या. त्या आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
कांदा प्रश्नावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. आम्ही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. कांदा, साखर यासंदर्भात भेट घेत घेतली आहे. शेतकरी अडचणीत येत आहेत. पॉलिसी मेकर म्हणजे जुमलेबाजी नाही, कांदा निर्यातबंदी केली, त्याचा जगात काय परिणाम झाला, असेही सुप्रिया सुळे म्हणाले. Supriya Sule
आधीचे मोदी सरकार आणि आताचे एनडीए सरकारला लोकांनी नाकारले आहे. कृषी खात्यात ११८ कोटींचा घोटाळा झाला आहे. हा आरोप राष्ट्रीय सुरक्षा संघाने केला असल्याचे सुळे म्हणाल्या.