Supriya Sule : धमक्या देणारांना सांगा की विधानसभा….!! सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य..


Supriya Sule : सध्या लोकसभा निवडणुका सुरू असून राज्यात जोरदार प्रचार सुरू केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई दिवसेंदिवस अधिक टोकदार हेात चालली आहे. पवार कुटूंबातच ही लढाई होत आहे.

याठिकाणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे अधिक आक्रम होताना दिसत आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीत जे धमक्या देत आहेत, भीती दाखवत आहेत, त्यांना सांगा की विधानसभेची निवडणुका फार लांब नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावर आता अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे पुरंदर तालुक्यातील नीरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विधानसभा निवडणुका लवकरच आहेत, हेही लक्षात ठेवा, असे आव्हान दिले आहे. Supriya Sule

सध्या काहीजण धमक्या देत आहेत, काही लोकांना भीती दाखवली जात आहे. पण त्यांना सांगा की विधानसभेच्या निवडणुकाही फार लांब नाहीत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक तसेच ग्रामपचायतींच्या सुद्धा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत. बॅंका आणि कारखाने कुणाचेही मक्तेदारी नाही, असे म्हणत त्यांनी इतर निवडणुका देखील लढवण्याचे संकेत दिले आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी कारखाने आणि पुणे जिल्हा बॅंकेची निवडणूक उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या विरोधात लढविण्याचे संकेत दिले आहेत. कारखाने, बॅंका, खरेदी विक्री संघ, दूध संघ, बाजार समितीच्या निवडणुकाही आता रंगतदार होणार आहेत, यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!