‘सोरतापवाडी’च्या सरपंचपदी सुप्रिया चौधरी बिनविरोध…

उरुळीकांचन : सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया देवेंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सामान्य गृहीणी व अराजकीय कुटूंबातील महिलेला सरपंचपदी विराजमान होण्याचा बहुमान यानिमित्ताने मिळाला आहे.
सोरतापवाडीच्या सरपंच पुनम नवनाथ आढाव यांनी ठरलेल्या निर्धारीत वेळेत आपला राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी बुधवार (दि.४)रोजी निवडणूक झाली. सरपंचपदासाठी सर्वोनुमते सुप्रिया चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी किशोर जाधव यांनी जाहीर केले आहे. माथाडी कामगार नेते बाळासाहेब चौधरी यांच्या सूचनेनुसार ही निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पार पडली आहे.
यावेळी निवडीप्रसंगी ज्येष्ठ नेते रामदास चौधरी,’यशवंत’चे संचालक शशिकांत चौधरी, दादासाहेब चौधरी, उपसरपंच विलास चौधरी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब चौधरी, पुणे फूलबाजार संघटनेचे माजी अध्यक्ष एम.एस.चौधरी,युवा नेते मनोज चौधरी, अमित चौधरी ,देवेंद्र चौधरी,नवनाथ आढाव , माजी तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब चोरघे, माजी उपसरपंच शंकर कड, निलेश खटाटे, विजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडीनंतर सुप्रिया चौधरी म्हणाल्या की, सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात विकासकामांचा सुरूअसलेला आलेख असाच पुढे नेण्याचा प्रयत्न असून स्वच्छ व सुंदर गाव संकल्पनेतून गावचा कारभार सर्व सहकाऱ्यांसमवेत करून पुढील काळात ठळक कामे मार्गी लावण्याचे माझे प्राधान्य राहिल असे त्या म्हणाल्या.