स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टाचा दणका, काय आहे प्रकरण?


मुंबई : सुप्रीम कोर्टाने आज स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बॉन्डबाबत दिलेल्या निर्णयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

तसेच स्टेट बँकेची याचिका फेटाळली असून निवडणूक रोख्यांची माहिती उद्यापर्यंत निवडणूक आयोगाला उपलब्ध करून द्या आणि निवडणूक आयोगाने १५ मार्चपर्यंत वेबसाईटवर ही माहिती प्रसिद्ध करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी आपल्याला जून महिन्यापर्यंत मुदत द्यावी, अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. त्यानंतर स्टेट बँकेने २४ तासांच्या आत, म्हणजेच उद्या, १२ मार्चपर्यंत निवडणूक रोखे तपशील सादर करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच आत्तापर्यंत तुम्ही कायका केलं, असा सवाल विचारत न्यायालयाने बँकेला फटकारल आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे एसबीआयला झटका बसला आहे. एसबीआयने ही माहिती देण्यासाठी ३० जून पर्यंत मुदतवाढ मागितली होती. पण इतकेदिवस तुम्ही काय केलं असा जाब सुप्रीम कोर्टाने बँकेला विचारला. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय दिला होता. निवडणूक रोखे योजना रद्द करण्याचे आदेश देत यासंदर्भातील रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला १३ मार्चपर्यंत जाहीर करण्यास सांगितलं होतं.

यावेळी एसबीआयच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. निवडणूक रोखे कोणी खरेदी केला याची आमच्याकडे संपूर्ण माहिती आहे, तपशील आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे तपशीलाबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा आहे. संपूर्ण माहिती देण्यासाठी एसबीआय बँकेला वेळ द्यावा अशी मागणी हरीश साळवे यांनी केली आहे.

सगळी माहिती गोपनीयरित्या मुंबईमधील मुख्य शाखेला पाठवली जात असेल तर मग निवडणूक आयोगाला द्यायला अडचण काय, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला आहे. तसेच उद्यापर्यंत सर्व माहिती सादर करा असे आदेश दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!