Supreme Court : सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांना दिला धक्का! घड्याळ चिन्हाबाबत घेतला मोठा निर्णय….

Supreme Court : राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेले. त्याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर आज (ता.२४) अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून घड्याळ चिन्हावर ‘न्यायप्रविष्ठ’चा उल्लेख नसल्याने त्याबाबत आता सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.
तसेच घड्याळ हे चिन्ह दोघांपैकी कोणालाही मिळू नये अशी आमची मागणी होती. मात्र, तुम्ही १९ मार्च रोजी हे चिन्ह बहाल करताना काही अटी घातल्या होत्या. मात्र, त्या अटींचे पालन अजित पवार गटाकडून झालेले नाही याकडे सिंघवी यांनी लक्ष वेधले. अजित पवार गटाकडून सूचनांचे पालन करण्यात आलेले नाही. Supreme Court
तसेच शरद पवार यांच्या नावाचाही वापर होऊ नये असा आदेश होता. मात्र, घड्याळ हे चिन्ह अजूनही शरद पवार या नावाशी जोडले गेले आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. तर अजित पवार गटाचे वकील बलवीर सिंग यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
दरम्यान, यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही गटांना खडसावत आम्ही दिलेला सूचनांचे पालन करा, अन्यथा आम्ही स्वतःहून अवमान ठपका ठेवू असा इशारा दिला. अजित पवार गटाने सर्व सूचनांचे पालन करत असल्याचे सांगत प्रतिज्ञापत्र आणि पुरावे सादर करू असे आश्वासन दिले आहे.