ब्रेकिंग! शेकडो समर्थकांसह बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का…
मुंबई : मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंना आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १३ खासदारांनी बंडखोरी केली होती. यानंतर सातत्यानं शिंदेंनी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत राज्यात विविध ठिकाणी आजी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात आणलं.
तसेच शिंदेच्या बंडानंतर बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अजूनही ठाकरे गटाची गळती सुरु आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी हार न मानता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ठाकरेंची साथ सोडणारे काही माजी आमदार आणि खासदार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासमवेत नगर जिल्ह्यातील शेकडो समर्थक पक्षात प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला शिर्डी लोकसभा मतदारसंघात खूप मोठा धक्का बसणार आहे. श्रीरामपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे हे देखील आजच पक्षात प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, आज दुपारी १२ वाजता मातोश्रीवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अकोला पूर्वचे माजी आमदार हरिदास भदे हे देखील ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षाच्या गळतीमुळे एकनाथ शिंदेच्या चिंतेत भर पडली आहे.