Sunetra Pawar : ब्रेकिंग! अजित पवार गटात मोठा गोंधळ, सुनेत्रा पवार यांना राज्यसभा देण्यावरून मंत्री नाराज…

Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीचं शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते.
सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं एका गटात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. Sunetra Pawar
ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा सवाल बुधवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याची माहिती मिळत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे.