महाराष्ट्रात मोठा राजकीय स्फोट! सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? एका वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात प्रचारात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते हे त्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी करत आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांनी तर तीन दिवसांपूर्वीच अशी भावनिक साद घातली आणि आता पवार कुटुंबातील दोन सदस्यांनी या मागणीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

लोकांच्या भावना अजून देखील दादांच्या जाण्याने दु:ख मनात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा आम्हाला वाटत होतं. परंतु झाली नाही म्हणून आम्ही प्रचार करीत आहोत. लोकांच्या समस्या जाणून त्या समस्या सोडवण्यासाठी मी जाणून घेतोय आणि त्या वहिनी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

रोहित पवार यांनी त्यांचे दौरे आखलेले आहेत आणि आम्ही आमचे दौर्‍यातून प्रचार करीत आहोत. युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि आम्ही दादांसाठी आणि वहिनी साठी प्रचार करतोय हे आमचं भाग्य आहे, असे अजितदादांचे चिरंजीव जय पवार म्हणाले.

विलीनीकरणावर मी भाष्य करणार नाही ही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यासाठी योगदान मोठं होतं यासाठी भारतीय जनता पार्टी मधील नेते प्रचार करत असतील तर ही बाब चांगली आहे.

उमेदवार सुनेत्रा पवार यांना दोन लाखापेक्षा जास्त लीड मिळेल. सर्वांना वाटत होतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, सुनेत्रा वहिनी पवार मुख्यमंत्री ही आशा संपूर्ण करू शकल्या तर सर्वांनाच आनंद होईल, असे मत जय पवार यांनी मांडले.

बारामतीमध्ये भाजपच्या वाढत्या हालचालींवर युगेंद्र पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार सक्रिय असताना भाजपचे नेते बारामतीत क्वचितच येत असत, मात्र आता त्यांच्या भेटी वाढल्या असून त्यामागे काहीतरी राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपचे बारामतीवर लक्ष असल्याचे सांगत, लोकसभा आणि विधानसभेत वर्चस्व मिळवण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचा टोला पवार यांनी लगावला. दरम्यान, भाजपकडून सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपद दिले, तर त्याचे स्वागतच करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीप्रकरणी सरकार अपयशी ठरत असल्याची टीकाही युगेंद्र पवार यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!