Sunetra Pawar : लोकसभेतील पराभवावर सुनेत्रा पवार यांचे मोठं वक्तव्य, म्हणाल्या, लाडक्या बहिणींनी…
Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतदारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाजूने मतदान केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.
लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाविषयी सुनेत्रा पवार यांनी भाष्य करत राज्यसभेच्या खासदारकीबद्दलही महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील कऱ्हागावज येथे बोलताना सांगितले की, मी जेव्हा जेव्हा निवडणुका असायच्या तेव्हा तेव्हा प्रचाराच्या निमित्ताने अनेक गावांमध्ये येत होते.
या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला काही ठिकाणी जाता आले नाही खरे तर तुम्ही सगळेजण आपले होता आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता माझ्या आणि दादांच्या लाडक्या बहिणींनी जो निर्णय दिला त्यामध्येही मी खुश आहे कारण शेवटी कशीही असली तरी या देशातील सर्वोच्च सभागृहात जाण्याची संधी मला मिळाली आणि त्यात तुमचा सर्वांचाही वाटा नक्की आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचे आभार असे त्या म्हणाल्या. Sunetra Pawar
सुनेत्रा पवार म्हणाल्या, जेव्हा दादा राजकारणात आले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी त्यांचा प्रचार केला आहे. घरातील कोणीही उभे राहिले की, मी प्रचार करायला बारामती तालुक्यातील प्रत्येक गावात जायचे. तुमच्याही गावात मी अनेकदा आले आहे. त्याच्यामुळेच मी माहिती नव्हते, असे नव्हते, पण तरीही हरकत नाही.
मी बारामतीकरांना नवी नव्हते, फक्त माझ्याविषयी जास्त माहिती नसावी. दादांची तुम्हाला माहिती होती, पण वहिनी काय करायची, ते कधीच कुणाला माहिती नव्हतं. तुमच्या सगळ्यांची भेट घ्यायची राहिली होती. म्हणून आज सगळीकडेच तालुक्यात फिरायचं मी ठरवले आहे.