एकरी 120 टन उसाचे उत्पादन मिळाले आणि शरद पवार ऊस बघायला थेट शेतात गेले, AI मुळे मोठी क्रांती…

बारामती : आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीतून शेतीमध्ये किती मोठे परिवर्तन घडवून आणता येते, याचे उत्तम उदाहरण बारामतीतील गोविंद बाग येथे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) मदतीने यंदा गोविंद बागेत एकरी सरासरी १२० टन ऊस उत्पादन मिळाले आहे.
विशेष म्हणजे मागील १५ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल ६० टनांची वाढ झाली आहे. आज शरद पवार यांच्यासोबत युवा नेते युगेंद्र पवार यांनी गोविंद बागेतील या अभिनव प्रयोगास भेट दिली. शेतीचे भविष्य केवळ पारंपरिक पद्धतींमध्ये नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनात आहे. हे अधिक सखोलपणे समजून घेतले.

हे तंत्रज्ञान केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी सर्व संबंधित संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. बारामतीतून सुरू झालेला हा प्रयोग राज्यातील शेतीच्या प्रगतीचा नवा वस्तुपाठ ठरेल, असा विश्वास वाटतो. असे यावेळी त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सध्या AI चा काळ आहे. शेतीमध्ये पाण्याची खताची बचत करून यायच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. हे या निमित्ताने समोर आले आहे. शरद पवार यांनी स्वतः पहिल्यांदा आपल्या शेतीमध्ये हा प्रयोग केला आणि तो आज यशस्वी झाल्याचे बघायला मिळाले आहे. अनेक शेतकरी यामध्ये सहभाग घेत आहेत.

उसाचे उत्पादन खर्च वाढल्याने उसाचे उत्पादन देखील वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यामुळे AI च्या माध्यमातून शेती केल्यास मोठे प्रमाणावर उत्पन्न वाढत असून शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.येणाऱ्या काळात यामुळे शेतीला नक्कीच चांगले दिवस येणार आहेत.
