तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन केलीआत्महत्या! शिरुर शहरातील घटना…

शिक्रापूर : तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातून समोर आली आहे.

याप्रकरणी संतोष रामदास सांभारे (वय ४५ रा. निमगाव भोगी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी प्रणव अशोक उबाळे (रा. ओयासीस कॉलनी, रामलिंग रोड शिरूर ता. शिरूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिरूर येथे तिच्या मामाच्या गावी राहत होती. मुलगी महाविद्यालयात जात असताना आरोपी प्रणव उबाळे हा वारंवार भेटून त्याच्याबर बोलण्यासाठी दबाव टाकत होता.

मुलीने भेटण्यास व बोलण्यास नकार देत असल्याने आरोपी प्रणव याने तू शिक्षण घेत असलेल्या शाळेत व शाळेबाहेर तुझी बदनामी करेल अशी धमकी देखील दिली. त्रास असह्य झाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.