मस्साजोग प्रकरणी जिंतूर, पूर्णा शहरात कडकडीत बंद, आरोपींना फाशीच देण्याची मागणी…

जिंतूर : मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
तसेच सहआरोपीची पुरवणी आरोप पत्रामध्ये नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज जिंतूर व पूर्णा शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कडकडीत बंद पाळण्यात आला. क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यामध्ये जबाबदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करावे, या मागणीसह संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पूर्णा शहर बंद पुकारण्यात आला होता. यास व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळ पासूनच व्यापार पेठ कडकडीत बंद ठेवली. सध्या राज्यात आंदोलन केली जात आहेत.
सकल मराठा समाज बांधवांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंच संतोष देशमुख अमर रहे, खुनाच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांना आरोपी करावे, अशा घोषणासह आरोपींच्या निषेधार्थ घोषणा देत पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्याकडे निवेदन दिले.
दरम्यान, यावेळी व्यापाऱ्यांनी बंदला चांगला प्रतिसाद दिला. आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले आहे. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, ही प्रमुख मागणी केली आहे.