UPI पेमेंट करताय थांबा! आधी हे समजून घ्या नाहीतर..,होईल मोठं नुकसान

नवी दिल्ली : आजकाल कॅश कोण ठेवतंय, सगळंच तर UPI वर होतं, इतका बिनधास्त तुमचा ॲटीट्युड असेल तर थांबा, तुमच्यासाठी ही बातमी कामाची आणि महत्त्वाची आहे. त्याचं कारण म्हणजे UPI ने आपल्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे नवे नियम ऑगस्टपासून लागू होणार असले तरी तुमची सवय मात्र आजच बदलली पाहिजे. नाहीतर या बदलेल्या नियमांचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. UPI वर बॅलन्स चेक करण्यापासून ते पेमेंटपर्यंत अगदी क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यापर्यंत सगळं यूपीआय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
दरम्यान, ३१ जुलैपासून UPI साठी विशेष लिमिट लावण्यात येणार आहेत. तुम्ही एक दिवसात एका महिन्यात किती वेळा बॅलन्स चेक करायचा यासाठीही लिमिट ठरवलं जाणार आहे. ३१ जुलैपासून UPI साठी विशेष लिमिट लावण्यात येणार आहेत. तुम्ही एक दिवसात एका महिन्यात किती वेळा बॅलन्स चेक करायचा यासाठीही लिमिट ठरवलं जाणार आहे.
युजर्स दिवसाला साधारणपणे 50 वेळा बॅलन्स चेक करु शकेल असा अंदाज आहे. त्याहून अधिक बॅलन्स चेक करता येणार नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. ऑटो पेमेंट संदर्भात देखील काही नवीन नियम लागू केले जाणार आहे. NPCI याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे.
ऑथरायझेशन, डेबिट प्रोसेसिंग या गोष्टी पीक टाइममध्ये होणार नाहीत. त्या इतर वेळेत केल्या जाऊ शकतात. हे बदलेले नियम तुम्ही वाचले नाहीत तर तुमचं नुकसान नक्की होऊ शकतं.