घरकुल योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! अनुदानात 50 हजारांची वाढ, मोफत वाळू आणि सौर पॅनलही मिळणार..

मुंबई : राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या बांधकाम खर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या योजनेतील अनुदानात 50,000 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना दर्जेदार घरकुल उभारण्यासाठी अधिक अर्थसहाय्य मिळणार आहे. यामध्ये मूळ अनुदान 1.2 लाख रुपयांवरून 1.7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यात 15,000 रुपये प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
यामुळे विजेचे बिल देखील येणार नाही. ही सौर प्रणाली उभारली नाही, तर संबंधित लाभार्थ्याला हे 15 हजार रुपये मिळणार नाहीत. लाभार्थ्यांचा नव्याने सर्व्हे होणार आहे. त्यामुळे यापर्यंत योजना मिळाली नसलेल्यांनाही याचा फायदा मिळू शकतो. सध्या सुरू असलेल्या टप्पा क्रमांक दोन अंतर्गत या सुधारित अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या टप्प्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
यामध्ये घरकुल बांधणीसाठी मूळ अनुदान : 1,20,000 रु, बांधकाम मजुरीसाठी : 26,000 रु, शौचालय बांधणीसाठी : 12,000 रु, नवीन वाढ 50,000 रु (यापैकी 15,000 रु सौर ऊर्जा यंत्रणेकरिता) एकूण मिळणारे अर्थसहाय्य 2,08,000 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना उत्तम दर्जाचे पक्के घर उभारता येईल. यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.
राज्य सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसह एकत्रितपणे घरकुल योजनेंतर्गत प्रत्येक घरात १ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही सौर यंत्रणा घराला प्रकाशमान ठेवेल आणि वीज खर्चात बचतही होईल. यामुळे ही योजना फायदेशीर असणार आहे.