SSC, HSC Exam : विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, दहावी बारावीच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या…

SSC, HSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेची तारीख ठरली आहे.
येत्या १५ दिवसात परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जाणार आहेत.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप बोर्डाकडून अधिकृतपणे तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच बोर्डाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत होण्याची शक्यता आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मुल्यमापन २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात होऊ शकतात. SSC, HSC Exam
तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.