Sortapwadi : सोरतापवाडीच्या लेकीच्या निमंत्रणाचा मान स्विकारुन नॉर्वेच्या विद्यापीठाचे प्राध्यापक गाव भेटीला! गावच्या लेकीने दाखविले बदलत्या भारताचे रुप..


जयदिप जाधव

Sortapwadi उरुळीकांचन : जगात भारताकडे रचनात्मक विकास , गुणात्मक कौशल्य व आधुनिक विज्ञान युगाच्या सुर्यास्ताकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस बदलत चालला आहे. भारत हा रचनात्मक विकासाकडे झुकण्यासह सामाजिक साक्षरता तसेच अर्थव्यवस्थेत एक अर्थिकशक्ती बनण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. त्यामुळे या देशाच्या व्यापक बदलाचे चित्र पाहण्यासाठी विदेशातील प्रमुख मान्यवर देशाला भेटी देत आहे. अशाच एका भेटीचा मोह नॉर्वे देशातील अग्रगण्य शिक्षण विद्यापीठ असलेल्या इन्व्हरसिटी ऑफ साऊथ ईस्टर्न नॉर्वे या विद्यापीठातील प्राध्यापकांना येऊन त्यांनी खेडेगावातील सोरतापवाडी ( ता.हवेली) गावाला भेट देऊन गावातील सामाजिक सुधारणा, पर्यावरण, विकासात्मक कार्य तसेच शैक्षणिक सुधारणांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

 

नॉर्वे देशात अभासक्रमातील एक प्रबंध करण्यासाठी गेलेल्या व विदेशात जाऊन आपल्या मायभूमी व जन्मभूमीच्या परिवर्तनशील विकासाची माहिती विद्यापीठातील प्राध्यापकांना देऊन विद्यापीठातील प्राध्यापकांना गावच्या लेकीने दिलेल्या या निमंत्रणानुसार नॉर्वे देशाच्या विद्यापिठातील प्राध्यापक मंडळाने शनिवारी( दि.४) सोरतापवाडी गावाला भेट दिली. देवयानी गणेश चौधरी असे गावच्या लेकीने मायभूमी व जन्मभूमीची बदलते रुप प्राध्यापकांना दाखवून सर्व स्तरातील बदलांचा परिणाम दाखवून गावच्या कौतुकाचा स्विकार या प्रध्यापक मंडळाकडून केला आहे. Sortapwadi

 

देवयानी चौधरी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.एस.सी. एम.एड. या शैक्षणिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे.देवयानी हिने शिक्षण पध्दतीचा अभ्यासक्रमातील एक प्रबंध म्हणून तिला नॉर्वे देशातील इन्व्हरसिटी ऑफ सार्ईथ ईस्टर्न या विद्यापीठाचा अभ्यास केला.या अभ्यासात तिने तेथील प्राध्यापकांना शिक्षणासह देशातील बदलत्या घडामोडींचे चित्र प्राध्यापकांसमोर मांडले. तिने ग्रामस्तरावर बदलत्या विकासात्मक दृष्टीकोन प्राध्यापकांना फोटोज ,व्हिडीओ द्वारे मांडुन तिने प्राध्यापकांना गावाला भेट देण्याची विनंती केली होती.

 

त्यानुसार नॉर्वे देशाच्या या विद्यापीठातील प्राध्यापक अस्र्नड आयास, मिसेस क्रिस्टीन, रंग्नील तसेच विद्यापीठातील विद्यार्थी सोरतापवाडी गावाला भेट दिली.यावेळी त्यांनी गावातील विकास, ग्रामपंचायतीचे कामकाज, पर्यावरणात वृक्षारोपण, नैसर्गिक पशू -पक्षी संवर्धनाचे काम, गावात शुध्द पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न तसेच शैक्षणिक पध्दतीत शाळा सौर्य प्रणालीवर चालू करण्याचा प्रयत्न तसेच गावातील स्थानिकांचा रोजगार असलेल्या नर्सरी व्यवसायातील आकर्षक रोपवाटिका तयार करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

 

यावेळी त्यांनी अंगणवाडी, पुरोगामी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षक व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विदेशातील शिक्षण पद्धतीतील माहिती अवगत करुन दिली. या भेटीत त्यांनी ग्रामखेडी सुधारणांच्या प्रयत्नांचे कौतुक करुन स्वच्छता अभियान , कचरा निर्मूलन ,शुध्द पाणी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी गावात निरंतर स्वच्छता अभियनात सक्रिय असणाऱ्या शितल चौधरी यांची त्यांनी विचारपूस केली.

 

तर सरपंच संध्या चौधरी व ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या भविष्यातील कामांची माहिती प्राध्यापक मंडळाला दिली. या भेटीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र व विस्तार विभागाच्या प्राचार्य गिता शिंदे या प्राध्यापकासमवेत उपस्थित होत्या. उपसरपंच रविंद्र गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य विलास चौधरी, विजय चौधरी , माजी उपसरपंच गणेश चौधरी हे यावेळी उपस्थित होते.

पशू -पक्ष्यांच्या अधिवासाचे कौतुक…

सोरतापवाडी गावात वृक्ष लागवडीतून नैसर्गिक सौदर्य साधण्यासह पर्यावरणातून निर्माण होणारी शितलता तसेच पशू- पक्ष्यांच्या अधिवासासाठी वृक्षांवर करण्यात आलेली घरटी तसेच बारमाही पक्षांना खाद्य मिळण्यासाठी चिंच, कउट, पेरू , जांभळ झाडांवर निर्माण झालेली फळे यामुळे पर्यावरणातील सूक्ष्म जीव संगोपण्याच्या पर्यावरण प्रेमी डॉ. गोपाळ हुड यांच्या प्रयत्नांचे तोंड कौतुक केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!