सोनमने फक्त ‘या’ कारणासाठी केला होता राजासोबत विवाह, धक्कादायक माहिती आली समोर.

इंदूर : इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात दररोज नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरले आहे. शिलाँग पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे.
सगळे आरोपी हे शिलाँग पोलिसांच्या कोठडीत आहेत. या दरम्यान आता आणखी एक नवीन दावा केला जात आहे. मनात नसतानाही सोनमला राजा रघुवंशीसोबत विवाह करावा लागला असल्याचा दावा करण्यात येत आहे.
सोनम आणि राजाच्या कुटुंबाचा दावा आहे की दोघांनीही कुटुंबाच्या संमतीने लग्न केले. तसेच, लग्नानंतर दोघेही खूप आनंदी होते. दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार सोनम या लग्नासाठी तयार नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.
सोनमने या लग्नाला तिच्या कुटुंबाच्या दबावामुळे आणि प्रतिष्ठेमुळे तिने होकार दिला. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांचा मोठा दबाव होता. राजाशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी सोनमला तिच्या वडिलांनी दिली होती, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, यानंतर सोनम रघुवंशी तिच्या वडिलांसमोर लग्नाला होकार दिला. मात्र, तिने तिच्या आईला धमकी दिली होती की जर तिने राजाशी लग्न केले तर त्याचे परिणाम सगळ्यांना दिसतील. त्यामुळे आता लग्न ठरल्यानंतरच सोनमने राजाला ठार मारण्याचा कट रचला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे काही दाव्यांनुसार, सोनमच्या घरातून भांडणाचे, वादाचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.
दरम्यान, राजा रघुवंशीचे कुटुंब अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाही. राजाचे वडील अशोक रघुवंशी म्हणाले आहेत की, मला शिलाँगला जाऊन सोनमला विचारायचे आहे की माझ्या मुलाला का मारलं? त्यांनी सांगितले की मी तिला भेटायला तिथे जाईन. मला माझ्या मुलाची खूप आठवण येते. तो माझ्या स्वप्नात येतो, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.