पुण्याच्या रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जावई असो वा कुणी, शिक्षा…


पुणे : पुण्यातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये दोन तरुणींचा देखील समावेश आहे. छापेमारीत पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हुक्का साहित्य आणि मद्य आढळल्याची माहिती मिळाली आहे. अशातच आता या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मला या प्रकरणाबद्दलची जास्त माहिती नाही. सध्याच्या वातावरणामुळे असं काही घडेल, असं मला वाटतंच होतं. मी केल्या आरोपांमुळे अडवलं जातंय, याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य बाहेर आलंच पाहिजे, मग तो जावई असो वा कुणी असो. पण त्याची सत्यता समोर आल्याशिवाय समजणार नाही. मी स्पष्ट मताचा माणूस आहे. मी कुणाला वाचणारा माणूस नाही.

कुणालाही अडवलं जाऊ शकतं. मला अधिकची माहिती घ्यावी लागेल. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण जर शडयंत्र असेल तर ते उघडकीस आलं पाहिजे, असं एकनाथ खडसे म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!