उरुळी कांचन परिसरात दारु भट्ट्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा ; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त…!


पुणे : शिंदवणे ,काळेशिवार , राठोड वस्ती, उरुळी कांचन, परिसरात सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा पाेलिसांनी छापा मारला असून, ३ लाख ४ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत ३ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात हातभट्टी दारुनिर्मिती आणि विक्री करणाऱ्याविराेधात कारवाई करण्याचे आदेश व अवैध धंद्यांवर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागा, गुन्हे शाखा पोलिस पथकाने उरूळी परिसरात असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर सोमवार (ता.२८) रोजी छापा मारला.

दरम्यान, पथकाने हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २ हजार ७०० लिटर रसायन, हातभट्टी निर्मिती करण्याचे साहित्य आणि हातभट्टी दारु असा एकूण ३ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पाेलिस पथकाने रसायन, हातभट्टी आणि हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य नष्ट केले. असुन, सदरबाबत एकुण तीन आरोपी विरूध्द लोणी काळभोर गुरनं. १७२ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हि.कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उप-आयुक्त गुन्हे अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!