…म्हणून सुप्रिया मला अमिताभ बच्चन म्हणाली! अजित पवारांनी थेटच सांगितलं

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना ‘अमिताभ बच्चन’ अशी उपाधी दिली होती. यावर आता अजित पवारांनी नेहमीप्रमाणे खुमासदार शैलीमध्ये उत्तर दिलेलं आहे.

अजित पवार म्हणाले की, भावाच्या प्रेमापोटी सुप्रियाने मला अमिताभ बच्चन म्हटलं असेल. माझी बहीण आहे. म्हणाली असेल तर तेवढं मनावर घेऊ नका.
वारकऱ्यांवर लाठीचार का झाला? अखेर आळंदी प्रशासनाने सोडले मौन..

राजकारणात काम करत असतांना मी कधीही मी ‘एँग्री यंग मॅन’चा तोरा दाखवलेला नाही. हो ला हो आणि नाही ला नाही म्हणायचं, ही आपली कामाची पद्धत आहे, असे अजित पवार म्हणाले.

काळजी घ्या! तीन दिवसांत उष्माघातामुळे ७४ जणांचा मृत्यू, अनेकांना त्रास सुरू
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. यावर सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांने मजेदार उत्तर दिले होते. ‘अमिताभ बच्चन सर्वच सिनेमात हवे असतात.
ब्रेकिंग! रिक्षाचालकाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?
त्यांच्या आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे चुकीचं काय आहे.’ असं सुळे म्हणाल्या होत्या. असे असताना आता अजित पवारांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.