यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ सराईत गुन्हेगारांना सहा महिने तडीपार ; अंकित गोयल यांचे आदेश


यवत : यवत (ता. दौंड) येथील आठ सराईत गुन्हेगारांना सहा महिने तडीपार करण्यात आले आहे. असे आदेश अधिक्षक अंकित गोयल यांनी दिले होते.

 

अक्षय लालु लकडे, शुभम बाळू लकडे, बाळू उर्फ भाऊ आबा लकडे, विशाल नंदू खताळ, सागर ठकू खताळ, खंडू धनाजी ठोकळे, रोहित गोपीनाथ गवळी, (सर्व राहणार यवत मानकोबावाडा तालुका दौंड जिल्हा पुणे,) गौरव नामदेव अवचर, (रा उरुळी कांचन ता हवेली जिल्हा पुणे), असे तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावी आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, या सराईत गुन्हेगारांनी आपली गुन्हेगारांची टोळी तयार करून, यवत परीसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत माजवून, गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारीचे कृत्य करीत होते. त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात वेळोवेळी कारवाई करूनही त्यांचे गुन्हेगारी वर्तनात कोणताही फरक पडला नाही.

 

त्यामुळे हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना सोनल शिंदे यांनी तयार करुन, उपविभागीय पोलीस अधिकारी मा, राहुल धस यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक मा,अंकित गोयल, यांना सादर करण्यात आला होता. सदरचे इसम हद्दपार झालेल्या तालुक्यात दिसुन आल्यास यवत पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

 

ही सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक,अंकित गोयल पुणे ग्रामीण, आनंद भोईटे, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती पुणे ग्रामीण, मा,राहुल धस उपविभागीय अधिकारी दौंड, यांच्या मार्गदर्शनाखाली, यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, पोहवा महेश बनकर, यवत पोलीस स्टेशनचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई विठ्ठल जगताप सह, फौजदार जी डी भोसले, पोहवा गुरु गायकवाड, पोहवा राम जगताप, पो हवा चांदणे, मपोना सोनल शिंदे, पो ना प्रकाश झैंडे, पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाराते, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जायभाय यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!