Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..


Sitaram Yechury : मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, महासचिव सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून न्यूमोनियामुळे ते त्रस्त होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी दुपारी ४ वाजता त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या रूपाने डाव्या चळवळीतील बिनीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक ब्राह्मण परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या.

सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता.

त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतले होते. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी हे देखील होते.

सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिक्षण घेत असताना राजकारणात सक्रिय झाले होते. ते जेएनयू विद्यार्थी संघाचे तीनवेळा अध्यक्ष बनले होते. येचुरी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रक वाचून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांचं ते आंदोलन चांगलंच गाजलं होतं. Sitaram Yechury

सीताराम येचुरी हे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजीत यांच्या आघाडीला पुढे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी 1996 मध्ये काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्यासोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला होता. त्यांनी २००४ मध्ये यूपीए सरकारच्या स्थापनेदरम्यान आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!