मोठी बातमी! एसआयटीची मागणी मान्य, वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात मोठा राडा..

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराडला आज बीड कोर्टात जर करण्यात आले आहे. यावेळी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. तसेच तपास अधिकाऱ्यांनीदेखील कोर्टात मोठे गौप्यस्फोट केले आहे.
बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी ९ ते १० ग्राउंडस मांडले.
दरम्यान, दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळत कराडची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल जाहीर केला. वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराड याच्यावर मकोकासारखा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल झाला आहे. दोन्ही गुन्हे अतिशय गंभीर असल्याने हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडची भूमिका तपासण्यासाठी सीआयडीने वाल्मिकच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या झाली, त्या दिवशी दुपारी ३.२० ते ३.३० दरम्यान आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी फोनवरून बोलणे झाले. एसआयटीने तपासादरम्यान कॉल ट्रेस केले.
एसआयटीने शेकडो फोनकॉल तपासल्यावर आम्हाला ही माहिती मिळाली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचा मोठा दावा एसआयटीचे प्रमुख तपास अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर केला.