वहिनी दिराच्या नात्याला काळीमा ! ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ विवाहित वहिनीचा विनयभंग ; थेऊर येथील धक्कादायक प्रकार …

लोणी काळभोर :” माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तु मला खुप आवडतेस “असे म्हणून दिराने वहिनीचा साडी फेडण्याचा प्रयत्न विनयभंग केल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दिराच्या विरोधात विनयभंगासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता ही विवाहित असून तिला दोन मुले आहेत. पिडीता यांच्या घराशेजारी असलेल्या खोलीमध्ये दीर, जाऊ व त्यांची दोन मुले राहतात. पिडीतेचे पती कामानिमित्त थेऊर गावात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यावेळी पिडीता व त्यांची मुले घरामध्ये होतो. ती घरांत स्वयपांक करीत असताना तिचा दिर पाठीमागुन अचानक आला, त्याने तिला मिठी मारली. व ‘तु मला खुप आवडतेस, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे’ असे म्हणाला. त्यावेळी त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी ती त्याला तु माझेशी घाण वागतोस हे मी पतीला सांगीन’ त्यावेळी त्याने तिचा हात धरुन जवळ ओढले. अंगावर नेसलेली साडी फेडू लागला. तेव्हा तिने त्याला ढकलुन दिले व जोरात आरडा ओरडा केली.तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन घराबाहेर बसलेले सासरे हे पळत आले. त्यावेळी तो तिच्या अंगाशी लगट करीत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर सास-यांनी आपल्या मुलाला लांब ढकलले. ढकलल्याचा राग मनात धरून त्याने वडिलांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली व ‘जर या प्रकाराबाबत तुम्ही दोघांनी कोणाला सांगितला तर मी तुम्हा दोघांना जिवे मारुन टाकीन, नाहीतर मी स्वःताचे काहीतरी बरे-वाईट करुन तुमच्या नावाने चिट्ठी लिहील’ अशी धमकी देवून तो तेथून पळून गेला.
घडलेल्या प्रकारामुळे पिडीतेच्या स्त्री मनात लज्जा उत्पन्न झाली आहे. पिडीतेने याप्रकरणी त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि आरोपी दिराच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास शिंदे करत आहेत.
