नाद करा की पण आमचा कुठं! कर्नाटकात तीन सख्ख्या भावांचा विजय..


कर्नाटक : काल कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असून भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे काँग्रेसने एक इतिहास घडवला आहे. असे असताना आणखी एक ऐतिहासिक घटना या निवडणुकीत घडली आहे.

ती म्हणजे तीन सख्खे भाऊ निवडून आले असून ते आता आमदार बनले आहेत. विशेष म्हणजे मराठी बहुल बेळगाव जिल्ह्यातून हे तिघे निवडून आले आहेत. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे.

यामध्ये रमेश लक्ष्मणराव जारकीहोळी (गोकक-भाजप), भालचंद्र लक्ष्मणराव जारकीहोळी (अराभावी-भाजप) आणि सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी (येमकरनमर्दी-काँग्रेस) या तीन सख्ख्या भावांचा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय झाला आहे.

दरम्यान त्यांच्या विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला. दरम्यान आता काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!