पुण्यातील IT क्षेत्रात खळबळ! विप्रोतील इंजिनिअर तरुणीचा खून; इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या प्रियकराला अटक


पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. कोमल राजेंद्र डहाके (वय २७, मूळ रा. वर्धा) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. तो इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.

वादानंतर मारहाण, तरुणीचा मृत्यू

प्राथमिक तपासानुसार, कोमल डहाके आणि शुभम काळबांडे यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर झालेल्या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोमलला हाताने मारहाण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि मारहाणीची घटना कुठे व कशी घडली, याचा तपास पोलीस करत आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

कोमलच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

प्रियकराला अटक, पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तपास सुरू केला. याप्रकरणी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे याला अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी केली जात असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरासह पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!