धनंजय मुंडे प्रकरणाला धक्कादायक वळण! आता वकिलांचा वेगळाच दावा, म्हणाले, करूणा शर्मा पत्नी नव्हे तर…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादाला मोठं वळण लागलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने यापूर्वी करुणा शर्मा यांच्यासाठी महिन्याला २ लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता.
मात्र करुणा शर्मा यांनी १५ लाख रुपयांची पोटगी मागणी करत न्यायालयात पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी विवाहासंबंधी विविध दस्तऐवज सादर केले.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी सांगितले की, १९९६ पासून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. आमचं लग्न मंदिरात झाले, जरी लग्नाचा प्रमाणपत्र नसेल तरी इतर कागदपत्रे, मुलांचे जन्म दाखले, पासपोर्ट, मृत्यूपत्र यामध्ये मला पत्नी म्हटलं आहे. त्यांनी हेही सांगितले की, त्यांनी २०१६ मध्ये तयार केलेल्या मृत्यूपत्रातही मला पहिली पत्नी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनी या सर्व दाव्याला विरोध करत करुणा शर्मा पत्नी नव्हत्या, ते दोघं केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असं कोर्टात सांगितलं. त्यांचे वकील युक्तीवाद करताना म्हणाले की, “करुणा शर्मा यांच्याकडे वैध विवाहाचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना पत्नी म्हणता येणार नाही.
दरम्यान, करुणा शर्मा यांनी कोर्टातच संताप व्यक्त करत म्हणाल्या की, माझे वकील योग्यरित्या बाजू मांडत नाहीत, त्यामुळे मी स्वतः मांडते. त्यांनी स्पष्ट केले की, धनंजय मुंडे यांनी माझं जीवन उद्ध्वस्त केले. माझ्या आणि मुलांच्या जीवाला कायम धोका आहे. २० कोटींचा सौदा करून माझ्याशी लग्न करणाऱ्याला पैसे देणार होते.