धक्कादायक! पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय,पोलिसांनी धाड टाकताचं मोठ रॅकेट..


पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच आता पोलिसांनी बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश उघड केला आहे. पुण्यामध्ये आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायवर पोलिसांनी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,पुण्यातील गुलटेकडी परिसरातील मुकुंदनगर आणि मार्केटयार्ड भागात हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत, मार्केटयार्ड भागातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे चार महिला काम करत असल्याचे आढळून आले. दुसऱ्या कारवाईमध्ये, मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक सेंटर या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरवर छापा टाकण्यात आला. या सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एक तोतया ग्राहक पाठवला. त्यानंतर, पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. आरोग्यसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.आता याप्रकरणी पोलिसांनी नागरिकांना या घटनांची त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. जेणेकरून अशा गैरकृत्यांवर वेळीच आळा घालता येईल. ही कारवाई एकट्या पुण्याची नसून, शहराच्या विविध भागांमध्ये अशाच प्रकारच्या केंद्रांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!