दौंड येथे कौटुंबिक वादाला कंटाळूनच डॉक्टरने संपवले कुटूंब! चिठ्ठीत धक्कादायक माहिती उघड…


दौंड : काल दौंड तालुक्यातील वरवंड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वरवंड येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला.

तसेच दोन मुलांना विहीरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन आत्महत्या करुन कुटुंबच संपवले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

डॉ. अतुल शिवाजी दिवेकर ( वय ४२) पल्लवी अतुल दिवेकर (वय ३९), अदिवत अतुल दिवेकर ( वय ९) वेदांती अतुल दिवेकर (वय ६) अशी यांची नावे आहेत. डॉक्टर अतुल दिवेकर यांनी कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे आहे.

डॉ. दिवेकर यांनी प्रथम पत्नीचा खून केला. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ते घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतातील विहित नेऊन टाकली आणि घरी जाऊन आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

या घटनेची माहिती मिळताच पाटस आणि यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे मात्र पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!