धक्कादायक! मंत्रालयातील सातव्या मजल्यावर सिलिंग कोसळलं; नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सिलिंगचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी किंवा कोणी जखमी झालेलं नाही.मात्र यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची रांग लागलेली असते. हजारो नागरिकांची येजा मंत्रालयात होत असते.रुग्णाला मदतनिधी मिळवून देण्यासाठी लोक इथे येत असतात. याच ठिकाणच सिलिंग कोसळल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आता अपेक्षित आहे.

मंत्रालयाच्या सिलिंगचा भाग कोसळल्याने जो ढीगारा खाली आला तो सफाई कर्मचाऱ्यांनी वेळीच हटवला. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र या दुर्घटनेमुळे मंत्रालयाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!