जळगावच्या माजी महापौरांचे धक्कादायक कृत्य ; ललित कोल्हे यांच्यासह 8 जणांना बेड्या..

जळगाव : जळगावच्या माजी महापौरांनी फार्म हाऊस वर केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देश आणि विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल. के. फॉर्म हाऊसवर छापा टाकला. यावेळी या ठिकाणी बनावट कॉल सेंटर होतं याचा खुलासा झाला. हे कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं. या कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी-विदेशी नागरिकांचे लाखो रुपये लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. विशेष म्हणजे फॉर्म हाऊसमधून तब्बल 32 लॅपटॉप आणि 7 मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती किती आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, या प्रकरणात ललित कोल्हे यांना आणखी कुणाचा वरदहस्त होता का? याचाीदेखील माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पोलीस तपासातून या प्रकरणाची सविस्तर माहिती समोर येऊ शकते.
