धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ लागला, महिला बाहेर पळाल्या…

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक थांबवून सायबर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची ऑनलाइन बैठक सुरु असताना स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडिओ सुरु झाला.
यामुळे मोठी खळबळ उडाली. अनेकांना नेमकं काय सुरु आहे, हेच समजत नव्हतं, तर महिला लाजून तोंडाला ओढण्या लावत पळून गगेल्या. यामुळे हा व्हिडिओ नेमका कसा लागला याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत माहिती अशी की, ही बैठक सुरु असताना ऑनलाईन असलेल्या सदस्यांपैकी जैसन नावाच्या युजरने अचानक अश्लील व्हिडिओ सुरु केले आणि एकच गोंधळ उडाला. यामुळे उपस्थित महिलांना नेमकं काय करावं हेच समजत नव्हते. यामुळे त्या बैठकीतील महिला अधिकारी तोंड लपवत पळाल्या. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना मुद्दाम केली की चुकून झाली याबाबत आता महिलांनी चौकशीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी संतोष कुमार शर्मा यांनी ही बैठक आयोजित केली होती. स्क्रीनवर जिल्हाधिकाऱ्यांची नजर पडताच त्यांनी मीटिंग लगेच बंद केली आणि एसपींशी बोलून प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, मीटिंगमध्ये अश्लील व्हिडिओ लावण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जैसन नावाच्या व्यक्तीने ऑनलाइन अश्लील व्हिडिओ चालवला, असे पोलिसांनी सांगितले असून याबाबत आता तपास सुरू करण्यात आला आहे.