सुप्रिया सुळेंना इंदापूरात धक्का! देवेंद्र फडणवीस दशरथ माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीला..!!


इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर शरद पवार गटात सक्रिय असणाऱ्या इंदापूरच्या दशरथ माने यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिल्याने माने कुटूंबिय लोकसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी च्या फुटीनंतर इंदापूर तालुक्यातील माने कुटूंबिय हे शरद पवार यांच्या गटात सक्रिय होते. त्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात शरद पवार यांच्या गटाची धुरा सांभाळली होती. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातही प्रविण माने हे आग्रस्थानी असल्याने माने कुटूंबिय हे शरद पवार सोबत राहतील अशी अपेक्षा होती.

मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर दौऱ्यावर दशरथ माने यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने माने कुटूंबिय हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरतील असा या भेटीमागील कारण स्पष्ट झाले आहे.

दरम्यान शिरुर लोकसभेतील वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार मंगलदास बांदल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!