लाडक्या बहिणींना धक्का! खात्यात 3000 नाहीच तर 1500 येणार, सरकारला आयोगाकडून निर्देश

पुणे : राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर असताना महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना संक्रातीला मोठे गिफ्ट देण्यात येणार होतं. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर संक्रातीला 3000 रुपये देण्यात येणार होते.मात्र आता या हत्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयोगाने सरकारला या योजनेतून फक्त पंधराशे रुपये देण्याचे यावेळी निर्देश दिले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सरकारला लाभ कसा देता येईल? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आली. आयोगाने सरकारला लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचे १५०० रूपयेच जमा होणार आहेत. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येऊ शकतो, असं म्हटले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचार संहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, या योजनेचा नियमित लाभ देता येईल. मात्र पुढच्या महिन्याचा लाभ या महिन्यात देता येणार नाही.तसेच नवीन लाभार्थीदेखील निवडता यणार नाहीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सरकारकडून 3000 रुपये ऐवजी 1500 रुपये मिळणार असल्याने लाडक्या बहिणीच्या संक्रातीवर निराशा आली आहे. त्यामुळे आता पंधराशे रुपये तरी खात्यावर जमा होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.