लाडक्या बहिणींना धक्का! E-KYC ची मुदत संपली ; तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींचा लाभ होणार बंद


पुणे : राज्य सरकारची महिलांसाठीची असलेली महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ आता अधिक काटेकोरपणे राबवली जाणार आहे.यामुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करण्याची मुदत संपली आहे. राज्यातील तीस लाख महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे महिलांचा लाभ बंद होणार आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, १ एप्रिलपासून फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू महिलांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता ई केवायसीची मुदत ही संपल्याने तब्बल तीस लाख महिलांचा लाभ या प्रक्रियेला मुदत वाढ न मिळाल्याने आता बंद होणार आहे.

आता या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे पोहोचल्या होत्या. त्यामुळे आता आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते आणि DBT तपासणी यांच्या आधारे पात्रतेची छाननी केली जात आहे. ज्या महिलांची माहिती अपूर्ण आहे किंवा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.

दरम्यान आता नव्या आर्थिक वर्षापासून केवळ पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे.. आता आयकर विभागाकडून पात्र महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अपात्र महिलेचे धाबे दणाणले आहे. ईकेवायसीच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबाची आर्थिक पडताळणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!