Shivsena : उद्धव ठाकरेंना शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह परत मिळणार?, आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी..

Shivsena मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे आणि ठाकरे गटाने निवडणूक आयोगात धाव घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदेच्या गटाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. Shivsena
या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबरला एक सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने पुढील सुनावणी ३ आठवड्यांनी घेण्याचा निर्णय घेतला. आज ही सुनावणी पार पडणार असून सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह देशाचं लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. Shivsena
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव देताना विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. या आकडेवारीनुसारच आयोगाने हा निकाल दिला होता.
तसेच २०१८ साली शिवसेना पक्ष घटनेत ज्या दुरुस्त्या केल्या गेल्या त्यांची आयोगाकडे नोंद नाही. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी जी पदाधिकारी नावे आयोगाला कळवली गेली त्यात प्रतिनिधी सभेचे विवरण नाही.
त्यामुळे संघटनेत बहुमत असल्याच्या कसोटीची शहानिशा होऊ शकली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये बहुमताचा निष्कर्ष ग्राह्य धरावा लागला, असं म्हणत आयोगाने निकाल दिला होता.
दरम्यान, , निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केलेली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.