शिवजयंतीसाठी किल्ले शिवनेरी सज्ज ! पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाहतुकीमध्ये मोठा बदल, व्हिडीओ प्रसारीत…!
पुणे : सध्या शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे. यामुळे शिवप्रेमी आनंदात उत्साहात आहेत. यासाठी शिवनेरी किल्ला देखील सज्ज झाला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. त्याबाबत त्यांनी व्हिडीओ प्रसारीत केला आहे.
यामध्ये सांगली सातारा, कोल्हापूर, पुणे इत्यादी ठिकाणाहून येणाऱ्या शिवभक्तांनी नारायणगाव याठिकाणी यावे. तसेच अहमदनगर, औरंगाबाद नाशिक, उत्तर महाराष्ट्र ,विदर्भ इत्यादी ठिकाणाहून आळे फाटामार्गे नारायणगाव याठिकाणी यावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नारायणराव येथूनच जुन्नरकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे यावे, पुढे जयहिंद कॉलेजच्या पुढे घोडेगाव येथे आल्यावर डावीकडे वळाले आणि धामलखेल येथे यावे, याठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. पुणे -नाशिक महामार्गावरुन नारायणगाव वरुन येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जाईल.
ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील. तसेच कल्याण नगर महामार्गावरुन शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील.
आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिस यांच्या कडून करण्यात आली आहे.