Shirur : शिरुर तालुक्याची मतमोजणी संपली; तालुक्यात माऊली कटकेंना २६, ८३६ चे मताधिक्य..

Shirur : महाराष्ट्रातील शिरूर विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. शिरूर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता.
मात्र २०१९ नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर आता येथे कोणत्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, हे औत्सुक्याचे होते. या मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यात दुरंगी लढत पाहायला मिळाली. Shirur
या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होतोय. त्यानुसार शिरुर तालुक्याची मतमोजणी संपली असून तालुक्यात माऊली कटकेंना २६, ८३६ चे मताधिक्य मिळाले आहे. तर पक्षाचे अशोक पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके
एकूण मते- ९०, २१३
अशोक पवार
एकूण मते – ६३,३८७