शिंदे सरकारचा सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय, चर्चांना उधाण…!
मुंबई : सध्या राज्यात शिंदे- फडणवीस सरकारने सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे.
यामुळे आता विरोधक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच या बदल्या केल्या गेल्या होत्या.
असे असताना आता देखील ही मोठी बातमी समोर आली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये मिलिंद म्हैसकर, मनिषा पाटणकर-म्हैसकर, राजगोपाल देवरा, बिपीन श्रीमाली, सीमा व्यास याचा समावेश आहे. त्यांना प्रशासनाच्या कामातील मोठा अनुभव आहे.
यामुळे त्यांच्यावर आता जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मिलिंद म्हैसकर यांनी अनेक पदावर काम केले आहे. तसेच ते म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ होते. तसेच मनीषा म्हैसकर यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.
तसेच जळगाव महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी देखील अनेक ठिकाणी काम केले आहे. याबाबतचे आदेश सरकारच्या नगरविकास विभागातर्फे काढण्यात आले आहेत.