शरद पवारांचे टेन्शन वाढणार ! लोकशाही , पुढारी वृत्तवाहीनीचा काय आहे सर्व्हे ..!!
Loksabha election : महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालापूर्वी अनेक एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामध्ये काही धक्कादायक निकाल लागणार असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बारामतीतच मोठा धक्का बसण्याची शक्यता एक्सिट पोल मध्ये वर्तविली आहे.
लोकशाही व पुढारी वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणात बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील व राज्यातील प्रमुख जागांचा अंदाज या सर्व्हेत नोंदविला आहे.
सुप्रिया सुळे यांच्याशिवाय एक्झिट पोलमध्ये पराभूत झालेल्या नेत्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार (चंद्रपूर) आणि व्हीबीएचे प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष ४ तारखेच्या निकालाकडे लागले आहे.
दरम्यान राज्यभरात भाजपप्रणीत महायुतीला २७ ते ३२ जागा तर महा विकास आघाडीला १५ ते २० जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. तर देशभरात एनडीएला ३५० हून अधिक जागांचा अंदाज विविध वृत्त वाहिन्यांनी वर्तविला आहे.