लव्ह जिहादबाबत शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले, लव्ह जिहादपेक्षा मोठ…
पुणे : देशामध्ये लव जिहादची अनेक प्रकरण समोर आली आहेत. या प्रकरणांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावर शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारत देशात आणि राज्यांमध्ये अनेक लोकांचे वेगवेगळे आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये इतर प्रश्न घुसडून उगाच त्या प्रश्नांना प्रसिद्धी दिली जात आहे. तसेच लव्ह जिहादपेक्षा मोठ-मोठे प्रश्न आहेत. असे मत शरद पवारांनी मांडले आहे.
थरारक हत्याकांडानं पुणे पुन्हा हादरलं! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या
पवार पुढे म्हणाले, विनाकारण समाजात प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अशा प्रकरणांना मीडियाने देखील जास्त प्रसिद्धी देऊ नये. देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण देण्याची गरज आहे. आदिवासी तसेच दलित समाजाचे संरक्षण करणे हे देखील सरकारचे काम आहे. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेचा उमेदवार ठरला? फायरब्रॅन्ड नेत्याची जोरदार चर्चा
महाविकास आघाडी अजूनही मजबूत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. देशात सध्या जो ट्रेंड चालू आहे तो भाजपविरोधी आहे.केरळमध्ये भाजप नाही. त्याचबरोबर तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये देखील भाजपची सत्ता उरली नाही.
देशात आज तीव्र उष्णतेची लहर तर काही ठिकाणी वादळी पाऊस, गारपीट; अचानक वातावरणात बदल..
गोव्यात त्यांची सत्ता कशी आली याची आपल्याला जाणीव आहे. आमदार फोडून त्यांनी हे राज्य बळकावलं. महाराष्ट्रात देखील त्यांनी तसंच केलं. असं शरद पवार म्हणाले आहेत.
२०२४ मध्ये लोकांचा कौल भाजपाच्या बाजूने जाईल याचे खूप कमी संकेत आहेत. हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही लोकांनी ते आपल्या कृत्यातून दाखवून दिलं आहे. असे देखील पवार म्हणाले आहे.