ब्रेकिंग! शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला मागे, केली मोठी घोषणा
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदापासून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. थांबायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
असे असताना आज निवड समितीने त्यांचा राजीनामा फेटाळला असून कार्यकर्त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता पवारच पुन्हा एकदा अध्यक्ष राहणार असल्याचे सांगितले गेले होते. यामुळे अनेकांनी उपोषण देखील केले होते.
आता स्वतः शरद पवार यांनी आपण निवृत्तीची घोषणा मागे घेत असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता तेच अध्यक्ष राहणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले होते. यावेळी मोठा राडा झाला होता.
यामुळे आता नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता पवारच अध्यक्ष राहणार आहेत. यामुळे आता अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.