Sharad Pawar : शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार!! केलं मोठं वक्तव्य, कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले…


Sharad Pawar : लोकसभेनंतर आता विधानसभेतही पवार विरुद्ध पवार असा बारामतीच्या मातीत सामना रंगला आहे. एक बाजी शरद पवार यांनी मारली आहे. तर विधानसभेत अजितदादांच पुन्हा कसल लागणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

नातवासाठी चक्क आजोबा मैदानात उतरले आहेत. अजितदादांबाबत कोणतीही तक्रार नाही. नवं नेतृत्व तयार करायला हवं त्यामुळे तुम्ही युगेंद्रला सपोर्ट करा अशी भावनिक साद शरद पवारांनी जनतेला घातली. प्रचारसभेदरम्यान शरद पवार यांनी राजकारणातून कधी निवृत्ती घेणार याचेही संकेत दिले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले.

मी सांगू इच्छितो की मी सरकारमध्ये नाही. अजून १.५ वर्ष आहे, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, १४ वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत मी. आघाडीचा पाठिंबा युगेंद्र यांना आहे एक नवीन नेतृत्व आहे. आघाडीचा पाठिंबा युगेंद्र यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे.

माझ्याकडे जेव्हा राज्य होतं तेव्हा मी पुण्याचा विचार केला होता की फक्त शेतीवर सगळं होणार नाही. या सरकारने काय जादू केली माहिती नाही. टाटा एरबसचा कारखाना नागपूरवरून गुजरातमध्ये नेला. सेमी कंडक्टरचा एक कारखाना ज्याचे नाव वेदंता फॉक्स कॉन हा कारखाना सुद्धा गुजरातमध्ये गेला. Sharad Pawar

एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा. इथे सत्ता बदलायला हवी सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. असा आमदार पाहिजे अधिक लोकांच्या हाताला काम देईल. पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यात खोलात मी आत्ता जात नाही ज्यांच्याकडून झालं नाही त्यांना सुद्धा विश्वासात घेऊ .

युगेंद्र यांच्यापाठीशी मी आणि माझे सहकारी उभे राहू. मला काही नको, आमदारकी नको, खासदारकी नको तुमचे राहिलेले कामं पूर्ण करायची आहेत. राज्याचे नेतृत्व कोणीही करेल त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू.

काही लोकं सांगतात मी लोकांना सांगेल भावनेने आवाहन करेल, काही गरज नाही मी माझ्या लोकांना ओळखतो. सुप्रिया सुळे यांना ४८ हजार मते जास्त देईल, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपण आपले प्रश्न सोडवून घेऊया.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!