शरद पवार आयोध्येला जाणार पण कधी? जुन्नरला शेतकरी मेळावा..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नरमधील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी नाशिक दौऱ्यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर केलेल्या टीकेलाही शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं नसल्याचंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण २२ जानेवारीला नाहीतर, नंतर नक्की जाणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.
घराणेशाहीवरुन मोदींवर केली टीका.
जुन्नरमध्ये कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी वेगेवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी घराणेशाहीच्या टीकेवरुन पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
