Sharad Pawar : शरद पवार यांचे आजचे पुरंदरचे कार्यक्रम रद्द, काय आहे कारण?, जाणून घ्या..

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवार यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आज रविवारी (ता. १२) होणारा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रमासह संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
शरद पवार यांना बारामतीत बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला. काल शनिवार (ता.११) विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले होते. Sharad Pawar
यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. पवार यांनी शनिवारी दिवसभर बारामतीतील भेटीदरम्यान विविध ठिकाणी माहिती घेतली त्यांनी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये बैठकही घेतली त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन तेथील नवीन प्रयोग यांची माहिती घेतली या ठिकाणी शरद पवार दोन ते अडीच तास होते. Sharad Pawar
त्यानंतर दुपारी दोन वाजता ते विद्या प्रदेशांच्या विश्वस्त बैठकीसाठी विद्या प्रशांमध्ये रवाना झाले विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञान सभागृहात ही विश्वस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी पवार पोचल्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले.
त्यामुळे तातडीने बारामतीतीलच डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांना पाचारण करण्यात आले डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला.
दरम्यान, डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने पवार यांचा आजचा रविवारचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.