बार्शीत शरद पवारांच्या सभेत मराठा आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न ! शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी म्हणून आंदोलक आक्रमक …


solapur  : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्याच अनुषंगाने शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमधील बार्शी येथे आज शरद पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली. सभेला येण्याआधी शरद पवारांचा ताफा कुर्डूवाडी येथे मराठा आंदोलकांनी आडवला होता. हे ताजे असतानाच आता शरद पवार यांचं भाषण सुरु असातना एक धक्कादायक घटना घडताना वाचली. सभेच्या ठिकाणी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणीच एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रसंग टळला असून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

बार्शी येथील सभेमध्ये शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. ४०० पार म्हणत होते, ३०० पारही जाता आले नाही, असा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रभाताई झाडबुके या माझ्यासोबत बार्शीच नेतृत्व करत होत्या. ओमराजे यांना 50 हजारांपेक्षा जास्त लीड बार्शीने दिला आहे. महाराष्ट्रात तुमचं हित जपणारे सरकार आणायचे आहे, अन्याय आणि जुलम करणारे सरकार खाली खेचा, असेही पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या बार्शीत आज ‘शेतकरी संवाद मेळावा’ पार पडला. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते माढा आणि धाराशिवचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटिल आणि ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार देखील झाला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शरद पवारांचा हा मेळावा आहे. अशी चर्चा सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!