Sharad Pawar : शरद पवारांमुळे पुरोगामी महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, भाजप आमदार पुन्हा एकदा नको तेच बोलला…

Sharad Pawar : सत्ता असताना शरद पवार यांनी महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले, असे वक्तव्य करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाजांनी दिलेली तेजाची झळाली शरद पवारांमुळे हरवली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे. तसेच शरद पवारांना राज्यावर सरंजामी लादायची आहे का? असा सवाल देखील पडळकर यांनी केला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. तुमच्यामुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंचं काम केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळं हरवली . पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का? असे ते म्हणाले. Sharad Pawar
पडळकर म्हणाले, मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आहे. शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षीत असणारा महाराष्ट्र जो १८ गड जातींचा आणि १२ बलुतेदारांचा तो ५० वर्ष पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट कंपनी म्हणून वापरल. आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी असा झाला आहे.