Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवार भाकरी फिरवणार, विद्यमान खासदाराचा निवडणूक लढण्यास नकार, आता ‘ही’ नावे आली चर्चेत..


Sharad Pawar : शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आरोग्याचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.

खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल, असेही शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे पवार कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची आघाडी झाली आहे. Sharad Pawar

या आघाडीने साताऱ्याच्या जागेवर सखोल चर्चा केली. साताऱ्याशी यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा महत्त्वाचा जिल्हा आहे. इथला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!